Wednesday, 4 April 2018

गरज व अपमान

असे म्हणतात की,
चांगले लोक नेहमी चांगले अनुभव देतात व वाईट लोक नेहमी वाईट अनुभव देतात..

उदा. जेव्हा गरज संपते तेव्हा काही लोक नेहमीच वाईटच वागतात फक्त अपमानच करायचा हा त्यांचा उद्देश पण काही लोक कितीही गरज असो वा नसो नेहमीच काहीतरी चांगले बोलेल नाही तर नाही बोलणार, ते अपमान का करावा म्हणून काम करीत असतात..

असे दोन अनुभव जगात पहायला व अनुभवास मिळतात.

Monday, 2 April 2018

मनाची गुंता

जेव्हा कुठे तरी मन अडकते जसे फॅमिली, मित्रपरिवार, नातेवाईक याच्या बरोबर तर त्या मनाला तो गुंता सोडणे अवघड होते, ते हृदय फक्त आपली बाजू मांडून मोकळे होते पण मन कधीच मोकळे होत नाही..

Sunday, 1 April 2018

इच्छा

जीवनात खुप काही सुंदर इच्छा असतात की आपण असे असलो किंवा आपण त्या पदावर राहिलो असतो तर खूप चांगली जीवनशैली असती;
पण आपण  हे विसरतो की तसे साध्य करायला मेहनत खूप लागते, व आपण जर एखादी इच्छा पूर्ण केले झाल्यास अजून नवीन इच्छा तयार होतात...

☺️तात्पर्य- समाधानकारक उत्तर कुठेच नसते न समाधान नसेल तर इच्छा कधीच पूर्ण होत नाही...😊,

Friday, 30 March 2018

ऑक्सिजन O2

असे म्हणतात की,
माणसावर प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा..

पण आपण हे का विसरतो की ज्याचा मूळे आपण  जीवन जगतो आहे तो ऑक्सिजन,
त्याच्यावर प्रेम करा ...

सकाळी सकाळी तो खूप स्वच्छ असतो त्यावेळेस त्याला भेटायला जायला हवं.
जास्त प्रमाणात उपलब्ध होईल त्यासाठी झाडे लावायला हवी...

लक्ष्यात ठेवा आरोग्य चांगले असेल तर जीवन अधिक चांगले होईल...

Wednesday, 28 March 2018

सवय उडायची

काही लोकांना हवेत उडायची सवय असते, पण त्यांना हे माहिती नसते उडण्यासाठी जी हवा लागते ती सभोवतालील असलेल्या लोकांकडूनच मिळते.☺️

Tuesday, 27 March 2018

Level of thinking

मनुफॅक्टअरिंग कंपनीत काम करताना,

1.मॅनेजमेंट जेव्हा एम्प्लॉयीकडे बघते त्या वेळेस त्यांना फक्त त्याची कॉस्ट (पैसा) दिसते, म्हणजे एका वक्तीवर एवढा खर्च का करावा.

2. एम्प्लॉयी जेंव्हा काम करतो कंपनी किंवा एखाद्या ऑर्गनिसशन मध्ये त्या वेळेस त्याला काम करताना त्याला फक्त आपल्या वर कमी केलेला कॉस्ट (पैसा) दिसतो, म्हणजे त्याला वाटते आपण सगळ्यांपेक्षा जास्त काम करतो.

अशा या दोन विभिन्न गोष्टी असतात विश्वात, यावर अजून कोणीही उत्तर शोधले नसेल पण त्याला एकच उत्तर आत्मिक समाधान मानावे सर्वांनी..

Sunday, 25 March 2018

द्विगुणित आनंद

कधी कधी असे वाटते,
रात्री उशिरापर्यंत या आकाशातून चमकणाऱ्या ताऱ्यांच्या मनसोक्तपणे आनंद घ्यावा.

मनसोक्त आनंद घेतला की आपला आनंद द्विगुणित होतो....

ⓂⓂशुभ रात्रीⓂⓂ

संगत निसर्गाची

निसर्ग निरागस  मन ही निरागस  दोघांची संगत  निसर्गाची संगत  मनाची शांतीला  खूप मोलाची