Sunday, 10 June 2018

काळजी स्वतःची, निसर्गाची

काही लोकांना सकाळी उठून मॉर्निंग वॉक,योगासने, प्राणायाम नाही आवडत,त्याचं एकच म्हणणे असते एवढा वेळ कुठे दिवसभर खूप व्यायाम होत असतो...

पण आपण दिवसभर आपल्या शरीरातील असलेली ऊर्जा वापरत असतो आणि ती ऊर्जा ज्यावेळी कमी होते त्याचवेळी आपल्याला डॉक्टर हा शब्द आठवतो...
त्यापेक्षा रोज शरीराची काळजी घेतली तर असे डॉक्टर हा शब्द खूप कमी आठवता येईल;
कारण प्रत्येक यंत्रणांना सर्विसची गरज असते पण ती कमी करायची असेल तर रोज त्या यंत्रणेची काळजी घेतली पाहिजे,असा नियम या सुष्टीमध्ये निसर्गाला,सर्व प्रकारच्या जीवाला लागू होतो☺️☺️☺️

Friday, 1 June 2018

Papa Birthday Special

जगात एक अशी वक्ती असते ती नेहमीच आपल्याला सोबत घेऊन चालत असते,
प्रत्येक गोष्ट लक्षात घेऊन ती योग्य वेळी मार्गदर्शन करण्यात अग्रेसर असते,
ही अशी वक्ती नेहमी माझ्या चुकीच्या पद्धती अचूकपणे कशा पूर्ण होतील याच नेहमीच आठवण करून देते,
अशा प्रकारच्या मार्गदर्शनामुळे आपण आज खूपच सुंदर अनुभव घेतो व जे काही आहे ते त्याच्यामुळे.…...

शब्द अपूर्ण पडतात जेव्हा आपण त्या वक्तीवर खूप प्रेम करतो..

Happy Birthday Papa...You are the ideal person of my life.....

Thursday, 31 May 2018

क्षण आणि वेळ_Birthday Special

जीवनातील एक क्षण अन वेळ या अश्या प्रकारे काम करतात की कळतच नाही क्षण व ती वेळ केव्हा निघून गेली;
पण त्या क्षणांचा अनुभव कुठेतरी पुढच्या वेळी जीवनात उपयोगी पडतात असेच ते आयुष्यतील प्रत्येक दिवस ती वक्ती अनुभवत असते अन त्याला त्याच्या वयाचा विसर पडतो.....

Wednesday, 30 May 2018

प्रश्न वयक्तिक व कामसंबंधीत

आपले काम अधिक गुणवत्तापूर्ण व अचूक होण्यासाठी कधीही आपल्या वयक्तिक प्रश्नांची उकल काम करताना करू नये फक्त कामासबंधीत प्रश्नांची उकल सोडवावी...☺️

आयुष्याचा सोबती

आयुष्यात काही ना काही कुठेतरी कुणीतरी सोबतीसाठी लिहिले असेल अन जेव्हा वेळ येईल तेव्हाच तो सोबती भेटेल...😊

Saturday, 26 May 2018

टाळ्यांचा कडकडाट

मंदिरात जाऊन लोक आरतीच्यावेळी टाळ्यांचा कडकडाट करतात, पण असे का करतात याचा काही विचार केला तर उत्तर काही वेगळी असते.

पण टाळी वाजवल्यामुळे आपल्या तळ हातावर अक्युपंचर असलेले पॉइंट प्रेस होतात व अक्युपंचर थेरपीचा वापर योग्य प्रमाणात होतो म्हणून रोज संध्याकाळी तरी देवाची आरतीसाठी गेले पाहिजे...

Friday, 18 May 2018

मनातील विश्व

असे म्हणतात की, जग खूप सुंदर आहे व त्या जगात सुंदर जीवन जगायला हवे...
सुंदर जीवन जगण्यासाठी आपले मनालाही अधिक चांगल्या विचारांनी सुंदर बनवले पाहिजे विचित्र व वाईट विचारांनी मन खचले जाते म्हणून असे विचार न करता
चांगले विचार करा व आपल्या मनाला अधिक प्रमाणात मजबूत करावे...
यामुळे आयुष्य या सुंदर जगाचा अनुभव घेईल☺️..

संगत निसर्गाची

निसर्ग निरागस  मन ही निरागस  दोघांची संगत  निसर्गाची संगत  मनाची शांतीला  खूप मोलाची