Sunday, 13 May 2018

Mother's Day Special

एक असा शब्द जो या जगात खूप महत्त्वाचा तो म्हणजे "आई";
आपल्याला जन्मापासून सांभाळणं व जगात कसे राहावे हे शिकवणं,
आपल्या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवणे,
आपल्या आवडीनिवडी व त्यांना नेहमी पाठिंबा देणे,
सदैव काळजी घेणे...
अश्या या एका शब्दाचा अर्थ खूप महान ...
Happy Mother's Day

संगीतमय मन

मनाला उत्साही करण्यासाठी संगीत ऐकावे, असे म्हणतात;
पण मनाला अधिक उत्साहित करण्यासाठी पक्ष्याचा सकाळी सकाळी तो सुमधुर किलबिल आवाज ऐकले की मनातील विचारांना अधिक बळ येते, म्हणून सकाळी निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ काढा.....🙂🙂🙂

Saturday, 12 May 2018

रिपोर्ट कार्ड

अपयश हातात आले की आपण कुठे चुकलो याचा शोध न घेता आपण बरोबर आहोत; ज्यांनी निकाल दिला ती सिस्टिम चुकीची असे म्हणतात.
आयुष्यात चुका शोधून आपण कुठे तरी कमी पडलो होतो व तिथे अधिक मजबूत होऊ असा निर्धार महत्वाचा ....

(उदा. Appraisal कमी झालं किंवा परीक्षेत कमी गुण मिळाले, काही तरी कुठे कमी पडलो असेल म्हणूनच असे झाले असेल हा विचार कोणी करत नाही; जिथे कमी पडलो तो भाग अजून मजबूत करायला हवा)

Wednesday, 9 May 2018

Birthday special

निराजींनी म्हणजे निर व अंजन ;
असेच सदैव निरामय अंजनासारखे चमकत रहा;
व सदैव निरामय आनंद या सुष्टीत निर्माण कर;
अन नेहमीच आनंदी रहा....

झटका मित्रपरिवाराकडून जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा नीरा

Thursday, 3 May 2018

मनाचा निवांत क्षण

मनाला जेंव्हा एकांत हवे असते ,
तेंव्हा ते फक्त ईश्वराकडे जाणे पसंत करतात,
ईश्वर अशी एक मार्ग आहे,
जिथे मनाला सुखरूप मार्ग मिळतो,
मनाचा विश्वास असेल तर तो ईश्वरावर,
मन खचले की त्याला एकच मार्ग दिसतो तो म्हणजे ईश्वर....
ईश्वराच्या सानिध्यात मन असे रमत असते की त्या मनाला सर्व गोष्टींचा विसर पडतो व ते अधिक मजबूत होऊन नवीन कामाला सुरुवात करते!!!

mmvicharatilgosti.blogspot.in

Friday, 27 April 2018

Birthday special

अत्यंत चिकाटी व मेहनत ही यांची खासियत,
सर्वांना सोबतीला घेऊन चालणारे,
मनाने खूप निर्मळ व साजूक,
कधीही मागे न वळता फक्त पुढे बघत भविष्याचा विचार करणारे,
अनुभवातून फक्त आपले विचार मांडणारे ;
असे आमचे सर्वांचे mixsome मित्र परेश यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐🎂🎂🎂

_!!Mixsome मित्र परिवार!!_

Thursday, 26 April 2018

बोलण्याची घाई फक्त

काही लोक खूप घाईघाईने बोलतात व ते समोरच्या व्यक्तीला समजत पण नाही,अशी लोक खूप कमी असतात...
असे म्हणतात की अश्या वक्तींना खूप घाई असते प्रत्येक कामात त्यांना लगेच ती गोष्ट संपून दुसरे सुरू करण्याची घाई...
अन घाई असताना पण ती थोडी आळशीपणा बाळगतात पण बोलताना कधीच आळशीपणा नसतो लवकर बोलून ते बोलणे पूर्ण करण्यासाठी;
असे पण म्हणतात की ही कितीही हुशार असली तरी आळशीपणामुळे आहे तिथेच राहतात.

संगत निसर्गाची

निसर्ग निरागस  मन ही निरागस  दोघांची संगत  निसर्गाची संगत  मनाची शांतीला  खूप मोलाची