जगातील चांगल्या विचारातील वक्तीसारखे आपले विचार व जीवन असू द्या, त्या लोकांवर विश्वास ठेवा कारण ते नेहमी चांगले विचार करतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळेल; उगाच विचारात विभिन्नता असलेल्या वक्तीवर विश्वास ठेवू नका आपण त्यांचे बळी पडू....
mmvicharatilgosti.blogspot.in
Tuesday, 10 April 2018
विचारात विभिन्नता
Monday, 9 April 2018
Birthday Special
अशी कशी ही आर्चू,
कधीच न कळणारी हिच्या मनाची व्याख्या,
कधीच न उमजाणारी हीच्या मनाच्या व्याख्यातील गुपित ज्ञान,
कधीच न कळणारी हीच्या गुपित ज्ञानाच साठा,
कधीच न कळणारी हिची लोकांबद्दल जपलेली आपुलकी,
कधीच न कळणारी हीच व्यक्तिमत्व,
कधीच न कळणारी हिची आवड निवड,
कधीच न कळणारी हिची मनातील गणितं व सूत्र,
फक्त मनाचं ऐकते कुणाचं काहीच नाही मन सांगेल तेच बाकी कोणीही नाही,
सर्वांना प्रश्न पडतो पण उत्तर सर्व समजून घेतात,कारण गणितं व सूत्र याची माहिती तिच्या मनालाच.,
अशी हि आर्चू
तू उंच भरारी घेत आयुष्यात खूप गणितं व सूत्र सोडवावी, खूप गोष्टी आयुष्यात घडतील व तसे लोक मिळतीलच त्यांना तू सामोरे जा.,
आशा करतो तुझं आयुष्य मजेत काठावे व सर्वांना मजेत ठेवावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
mmvicharatilgosti.blogspot.in
Wednesday, 4 April 2018
गरज व अपमान
असे म्हणतात की,
चांगले लोक नेहमी चांगले अनुभव देतात व वाईट लोक नेहमी वाईट अनुभव देतात..
उदा. जेव्हा गरज संपते तेव्हा काही लोक नेहमीच वाईटच वागतात फक्त अपमानच करायचा हा त्यांचा उद्देश पण काही लोक कितीही गरज असो वा नसो नेहमीच काहीतरी चांगले बोलेल नाही तर नाही बोलणार, ते अपमान का करावा म्हणून काम करीत असतात..
असे दोन अनुभव जगात पहायला व अनुभवास मिळतात.
Monday, 2 April 2018
मनाची गुंता
जेव्हा कुठे तरी मन अडकते जसे फॅमिली, मित्रपरिवार, नातेवाईक याच्या बरोबर तर त्या मनाला तो गुंता सोडणे अवघड होते, ते हृदय फक्त आपली बाजू मांडून मोकळे होते पण मन कधीच मोकळे होत नाही..
Sunday, 1 April 2018
इच्छा
जीवनात खुप काही सुंदर इच्छा असतात की आपण असे असलो किंवा आपण त्या पदावर राहिलो असतो तर खूप चांगली जीवनशैली असती;
पण आपण हे विसरतो की तसे साध्य करायला मेहनत खूप लागते, व आपण जर एखादी इच्छा पूर्ण केले झाल्यास अजून नवीन इच्छा तयार होतात...
☺️तात्पर्य- समाधानकारक उत्तर कुठेच नसते न समाधान नसेल तर इच्छा कधीच पूर्ण होत नाही...😊,
Friday, 30 March 2018
ऑक्सिजन O2
असे म्हणतात की,
माणसावर प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा..
पण आपण हे का विसरतो की ज्याचा मूळे आपण जीवन जगतो आहे तो ऑक्सिजन,
त्याच्यावर प्रेम करा ...
सकाळी सकाळी तो खूप स्वच्छ असतो त्यावेळेस त्याला भेटायला जायला हवं.
जास्त प्रमाणात उपलब्ध होईल त्यासाठी झाडे लावायला हवी...
लक्ष्यात ठेवा आरोग्य चांगले असेल तर जीवन अधिक चांगले होईल...
Wednesday, 28 March 2018
सवय उडायची
काही लोकांना हवेत उडायची सवय असते, पण त्यांना हे माहिती नसते उडण्यासाठी जी हवा लागते ती सभोवतालील असलेल्या लोकांकडूनच मिळते.☺️
संगत निसर्गाची
निसर्ग निरागस मन ही निरागस दोघांची संगत निसर्गाची संगत मनाची शांतीला खूप मोलाची
-
अधिक विचारांच्या सानिध्यात राहिले की मन डिप्रेशनमध्ये जाते..... असे निराशाजनक वातावरण निर्माण झाले की मनात चिडचिड निर्माण होत असते.... त्य...
-
मनात विभिन्न विचार असतील तर प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या विचारांची भीती वाटेल आणि जीवनाचा आस्वाद नकोसा वाटेल..... विचार असे करा ज्यामुळे मन...
-
Create own assets to build up financial freedom....