Tuesday, 28 July 2026

Health in Nature

Health is woven in our very breath,
And breath is the anchor of our life...

Life finds its foundation in Nature,
Just as our breath relies on Nature!

​Pure air rests in the lap of beautiful Nature,
A joyful life finds its grounding in Nature...

And our health draws its strength from this wondrous Nature!
​So let us come together,
To cherish and protect this Health and Nature,

For the sake of our beautiful life...

​If there is Nature, there is Health.
If there is Nature, there is Life!
@mmvicharatilgosti 💭

निर्मळ आयुष्य

श्वासात आपलं आरोग्य,
आरोग्याला आधार जीवनाचा...

जीवनाला आधार निसर्गाचा,
श्वासाला आधार निसर्गाचा...

निर्मळ हवेला आधार निसर्गाचा,
आनंददायी जीवनाला आधार निसर्गाचा...

आरोग्याला आधार या सुंदर निसर्गाचा!

​अशा या आरोग्याला आणि निसर्गाला
जपावं आपण,

आपल्या सुंदर आयुष्यासाठी...

​निसर्ग असेल तर आरोग्य,
निसर्ग असेल तर आयुष्य!
@mmvicharatilgosti 💭

Saturday, 25 July 2026

Life and Nature

On life's journey,
one encounters nature;
in that encounter,
the mind finds solace.
Nature dwells within the mind,
the mind finds itself in nature;
the knots within the mind
unravel amidst the embrace of nature...
Such is life,
and such is nature!
@mmvicharatilgosti 💭

आयुष्य आणि निसर्ग


आयुष्याच्या वाटेवर
निसर्ग भेटतो,
निसर्गाच्या भेटीत
आपलं मन रमतं.
​मनात निसर्ग,
निसर्गात आपलं मन,
मनातील गुंता
सुटतो निसर्गाच्या गुंततेत...
​असं हे आयुष्य
आणि हा निसर्ग!
@mmvicharatilgosti 💭

Friday, 17 July 2026

mind and its decision

"Some decisions in life,
Life within those decisions.
Ourselves in the midst of life—

Some decisions right,
Some decisions wrong.

What is right, what is wrong

We find ourselves caught between the two.

There are some decisions

That the heart sometimes simply does not want...

Should we cherish our own heart,

Or

Should we cherish the heart of our companion...

Such is the heart, and such are its decisions..."

मन आणि त्याचे निर्णय

​आयुष्यातील काही निर्णय,
निर्णयातील आयुष्य...

आयुष्यातील आपण,
काही निर्णय योग्य,
काही निर्णय अयोग्य...

योग्य काय, अयोग्य काय,
यात अडकलो आपण...

असेच काही निर्णय
मनाला कधी नकोसेही असतात...

असे मन आपले जपायचे,
की
असे मन आपल्या सोबत्याचे जपायचे...

असे हे मन आणि त्याचे निर्णय......
@mmvicharatilgosti 💭

Sunday, 28 June 2026

तू आनंदी..

तुझ्या आठवणीत 
तुझ्या सहवासात 
जीवन आनंदमय जावं 
आणि त्यासाठी, तू आनंदी हवी नेहमी...

Friday, 15 May 2026

आयुष्य आणि मन

आयुष्याची पायवाट गडद, अनंत धूसर,
मनाची ओढ जगात भरली, थोडी जळती, थोडी हलकी.
आशांचा कोंब, स्वप्नांची केसरी लाट,
मनाच्या काठावर, गुंता जडला सहा.

वाऱ्याच्या कुशीत, मन भिरभिरतं,
जगाची लहर, त्याला खेचून नेतं.
असमान गुंफणे, अनुभवांची कथा,
कधी हसतं, कधी आतून फाटतं.

सामना करताना मन चिरते,
आयुष्याच्या गूढात, धडपडते,
पण ज्याने स्वीकारलं, त्यानेच पाहिले,
दोघांची अनोखी भिन्नता, यांत्रिकी नातं जपले.

मन भासवतं, आयुष्य हळूच चालतं,
दोघांचे नाते, कवितेत हरवून जातं.
उभा राहून समजून घे, या उदात्त प्रवासात,
आयुष्य आणि मन, एकत्रित ते बघतात.

आयुष्य आणि मन

आयुष्य आणि मन हे आपण स्वतः कधी समजू शकत नाही 
मन हे कुठे तरी काय बघून भरकते 
आयुष्य हे काही तरी समोर येऊन ठेवते 
जगणं हेच दोघांना घेऊन 
मनाला समजू शकतो आता हे आयुष्य 
पण आयुष्यला नाही समजू शकत...
आयुष्य आणि मन.....

Monday, 9 February 2026

तू आणि आपलं नातं

तुझं माझं नातं, चॉकलेटासारखं गोड असावं,
गोड आठवणींनी सजलेलं, हसतं, बहरतं फुलांसारखं असावं...

प्रेमाचं हे गोडसर नातं,
स्वप्नांच्या रस्त्यावर चालतं, 
सदा सुखाचं ऋतू चांदणीत झळतं...

तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण,
आनंदाचा गोड गजर, सतत हृदयात उमलतं...

तू आणि मी, एक धागा, एक सूत्र,
भविष्य गोडसर प्रेमाने भरून जावो,

हे नातं एका गोड स्वप्नासारखं...

❤️🌹❤️Happy Anniversary Harshu ❤️🌹❤️

Thursday, 1 January 2026

आयुष्याचं पान

आयुष्याचं पान, दिवसासारखं रोज बदलते,
बदलत्या रंगांतून, छायाचित्रे दाखवते...
त्या बदलत्या आयुष्याला, आपण सामोरे जातो,
स्वप्नांच्या गजरात, नवे दरवाजे उघडतो...

वर्ष हे सरते, काळाच्या ओघात वाहत,
समयीच्या क्षणांत, आठवणींचं गाणं गातात...
सरत्या वर्षाला, काही सोबत घेवून जातो,
आठवणींच्या बागेत, थोडंसं साठवून जातो...
🌹अशाच या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹2026🌹
🌹Happy New Year 2026🌹

Tuesday, 21 October 2025

People Eye Power

"Don't talk about or share your latest goals or plans with others....
People with a watchful eye can ruin your journey toward success....."

Saturday, 20 September 2025

हर्षु

हर्षु....
आयुष्यात तू माझ्या आलीस 
न समज मला आयुष्याची 
आयुष्य काय असते 
हे समजलं मला तुझ्या प्रेमाच्या छायेत 

तुझ्याविना आयुष्य होतं अपूर्ण
तुझ्यासोबत आयुष्य होते पूर्ण 

या प्रेमाच्या छायेत सैदव असावं मन तुझं माझं 


Wednesday, 17 September 2025

Rahasymay Gost Ayushyachi

जीवनातील एक रहस्यमय गोष्ट ती म्हणजे आपले आरोग्याची काळजी घेणे....

आपण काय खातो, काय पितो हे खूप महत्वाचे...

आपण पौष्टीक खाणे ही जीवन नाही करत 

आपण पाव वडा, वडापाव, पिझ्झा, बर्गर, जास्त कॅलरी, जास्त carbs, नशा असलेलं पेय, coke हे मनाचे चोचले असलेले पदार्थ याची जीवनशैली स्वीकारतो....

जीवनतील खरा आनंद शोधावा तर तो या सुष्टी ने तयार केलेल्या प्राणवायू मध्ये, योगासन मध्ये 

आयुष्य असेच आहे 

आपण खूप ताण, खूप प्रेशर आहे म्हणून या मनाला अल्कोहल देतो आणि तात्पुरता का होईना शांत करतो 

पण याच मनाला तुम्ही शुद्ध ऑक्सिजन पूरवला, शरीराला घामात काढले तर हे मन अधिक शांत होईल....

मनाची व्याख्या आपण लिहिली तर अधिक चांगली, समोरील व्यक्ती च बघून आपण आपली जीवनशैली बिघडून स्वतःला धोक्यात का टाकायचं....

आपला आहार, आपलं वर्तणूक, आपलं कर्म, आपलं शरीर, आपला परिवार, आपले मित्र हेच आपलं आयुष्य व आपलं जीवनशैली...

आजकाल आपण शाळेत शिकवलेले सुविचार विसरलोय 

*"आरोग्य हीच खरी संपत्ती"*

Saturday, 13 September 2025

जीवनशैली

जीवनातील मौल्यवान आणि आनंदमयी जीवनशैली म्हणजे परमेश्वर...

clean Mind

जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वच्छ पाण्यासारखे आपले मन स्वच्छ करा.

Clean our minds like this clean water flows to face the challenges of life

Saturday, 23 August 2025

मन आणि निसर्ग

मन हे निसर्गासोबत जुळलं की सर्व मन हे आनंदमय होऊन जाते 

Saturday, 2 August 2025

Life Motivation

Motivation for life is discipline and working hard to achieve our aim of life.

जीवनाची प्रेरणा म्हणजे शिस्त आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करणे.

Wednesday, 2 July 2025

स्वामींच नामस्मरण

आयुष्यातील काही करायचं आणि निर्णय घेण्यासाठी स्वामींच नामस्मरण करायचं...

Sunday, 22 June 2025

निसर्ग आणि जीवनातील प्रवास

जीवनातील प्रवास हा निसर्गासोबत असेल तर 
आयुष्य अजून सुखदायी प्रवासमय होऊन जाते...

Health in Nature

Health is woven in our very breath, And breath is the anchor of our life... Life finds its foundation in Nature, Just as our breath relies o...