प्रेम करा पण स्वतः वर करा, आई वडिलांवर करा, मित्राबरोबर करा कारण ही तुमची हक्काची मालमत्ता आपल्या हक्कावर जगले तर कधीही चांगले पण ज्या वर हक्क नाही अशा गोष्टीवर काहीही करू नका खूप त्रास होईल..
Thursday, 12 April 2018
Wednesday, 11 April 2018
घाबरट जीव
माणूस माणसाला व परिस्थितीला घाबरत असतो ,
एकतर तो त्या वक्तीच्या बळाला घाबरतो नाहीतर
माणूस ज्याच्या वर जास्त मन लावतो त्याला घाबरतो..
उदा.
1.परीक्षेच्या वेळेस पेपर कठीण गेला एवढा मन लावून अभ्यास करून सुध्दा...
2. आई वडिलांना आपल्या मुलांना प्रेम देतात ती मुले पण त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात, त्यावेळी दोन्ही बाजूंना जीव मुठीत असतो
Tuesday, 10 April 2018
विचारात विभिन्नता
जगातील चांगल्या विचारातील वक्तीसारखे आपले विचार व जीवन असू द्या, त्या लोकांवर विश्वास ठेवा कारण ते नेहमी चांगले विचार करतात त्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळेल; उगाच विचारात विभिन्नता असलेल्या वक्तीवर विश्वास ठेवू नका आपण त्यांचे बळी पडू....
mmvicharatilgosti.blogspot.in
Monday, 9 April 2018
Birthday Special
अशी कशी ही आर्चू,
कधीच न कळणारी हिच्या मनाची व्याख्या,
कधीच न उमजाणारी हीच्या मनाच्या व्याख्यातील गुपित ज्ञान,
कधीच न कळणारी हीच्या गुपित ज्ञानाच साठा,
कधीच न कळणारी हिची लोकांबद्दल जपलेली आपुलकी,
कधीच न कळणारी हीच व्यक्तिमत्व,
कधीच न कळणारी हिची आवड निवड,
कधीच न कळणारी हिची मनातील गणितं व सूत्र,
फक्त मनाचं ऐकते कुणाचं काहीच नाही मन सांगेल तेच बाकी कोणीही नाही,
सर्वांना प्रश्न पडतो पण उत्तर सर्व समजून घेतात,कारण गणितं व सूत्र याची माहिती तिच्या मनालाच.,
अशी हि आर्चू
तू उंच भरारी घेत आयुष्यात खूप गणितं व सूत्र सोडवावी, खूप गोष्टी आयुष्यात घडतील व तसे लोक मिळतीलच त्यांना तू सामोरे जा.,
आशा करतो तुझं आयुष्य मजेत काठावे व सर्वांना मजेत ठेवावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
mmvicharatilgosti.blogspot.in
Wednesday, 4 April 2018
गरज व अपमान
असे म्हणतात की,
चांगले लोक नेहमी चांगले अनुभव देतात व वाईट लोक नेहमी वाईट अनुभव देतात..
उदा. जेव्हा गरज संपते तेव्हा काही लोक नेहमीच वाईटच वागतात फक्त अपमानच करायचा हा त्यांचा उद्देश पण काही लोक कितीही गरज असो वा नसो नेहमीच काहीतरी चांगले बोलेल नाही तर नाही बोलणार, ते अपमान का करावा म्हणून काम करीत असतात..
असे दोन अनुभव जगात पहायला व अनुभवास मिळतात.
Monday, 2 April 2018
मनाची गुंता
जेव्हा कुठे तरी मन अडकते जसे फॅमिली, मित्रपरिवार, नातेवाईक याच्या बरोबर तर त्या मनाला तो गुंता सोडणे अवघड होते, ते हृदय फक्त आपली बाजू मांडून मोकळे होते पण मन कधीच मोकळे होत नाही..
Sunday, 1 April 2018
इच्छा
जीवनात खुप काही सुंदर इच्छा असतात की आपण असे असलो किंवा आपण त्या पदावर राहिलो असतो तर खूप चांगली जीवनशैली असती;
पण आपण हे विसरतो की तसे साध्य करायला मेहनत खूप लागते, व आपण जर एखादी इच्छा पूर्ण केले झाल्यास अजून नवीन इच्छा तयार होतात...
☺️तात्पर्य- समाधानकारक उत्तर कुठेच नसते न समाधान नसेल तर इच्छा कधीच पूर्ण होत नाही...😊,
People Eye Power
"Don't talk about or share your latest goals or plans with others.... People with a watchful eye can ruin your journey toward succe...
-
रिम झिम पाऊस.....🌧️ रिम झिम पावसाच्या थेंबांत,☔ तुझ्या शब्दांची गूंज, रिम झिम प्रेमाच्या सुरात, संपूर्ण जग विसरून.... तू आणि मी, एकत्र या क...
-
🤸🏻♂️Fitness is a smooth lifestyle journey🚶🏻, while diverting from fitness is a hard lifestyle 🥱....
-
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे..... ..... स्वतः वर नियंत्रण 🙂🙂🙂....